Kalyan Jewellers India Limited - Articles

सेलिब्रिटींद्वारे-प्रेरित ज्वेलरी शैली – पार्टीची तयारी

Publisher: blog

सुटीचा हंगाम जोमात आहे आणि याचा अर्थ उत्सवाच्या मेळाव्यात चमकण्याची आणि चमकण्याची वेळ आली आहे. तुम्ही आपल्या हॉलिडे स्टाईलमध्ये ग्लॅमरची जोड देण्याचा विचार करत असाल तर, काही सेलिब्रिटी-प्रेरित दागिन्यांच्या शैलींची ठळक माहिती इथं दिली आहे जी निःसंशयपणे नजरा वळवेल.

साधेपणाच्या अभिजाततेवर इतर कोणतीही गोष्ट मात करु शकत नाही. साधेपणामध्ये एक निर्विवाद आकर्षण आहे, या प्रतिकाला सदैव सुंदर अभिनेत्री आणि केजे ब्रँड अॅम्बेसेडर रश्मिका मानधना यांनी अधिक उंचीवर नेले आहे. डबल-लेयर्ड डायमंड-स्टडेड चोकर नेकलेस निवडून तिच्या शैलीचे अनुकरण करा. त्याला क्लासिक ड्रॉप इअररिंग्जची जोड द्या आणि ताऱ्यांप्रमाणे चमका. सुशोभित बांगड्यांचा संच तुमच्या संपूर्ण लुकला एक खेळकर, उत्सवाचा स्पर्श देऊ शकतो. तुमचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणार्‍या निवडक छटेसाठी विविध डिझाइन्स एकत्र करा आणि जुळवा.

तुम्हाला पारंपारिक कार्यक्रमांसाठी सोनेरी ग्लॅमर आवडत असेल, तर मराठी अभिनेत्री आणि आमची ब्रँड अॅम्बेसेडर- पूजा सावंत हिच्याकडून कल्पना घ्या, पारंपरिक मंदिरांच्या डिझाइन तिने घातल्या आहे. एक लांब हारम आणि त्याला जुळणारा लहान नेकलेस तुमच्या पारंपारिक लुकमध्ये शोभा वाढवेल. झुमक्यांसारखे जुळणारे कानातले निवडून तुमचा पारंपारिक लुक वाढवा आणि तुमचा चेहरा सुंदर मांग टिक्काने फ्रेमबद्ध करा. तुम्ही लेहेंगा किंवा साडी घातल्यास, कमर बंध किंवा सोन्याचा पट्टा घालून ग्लॅमर वाढवा. सिंगल सोन्याचे कडे किंवा विविध प्रकारच्या बांगड्यांनी लूक पूर्ण करा आणि मनमोहक अंगठीद्वारे ठळकपणा देण्याचे लक्षात ठेवा. सोन्याचा स्पर्श तुमच्या लूकमध्ये उबदारपणा आणि समृद्धी वाढवतो, आणि तुम्ही उत्सवाच्या गर्दीत वेगळे दिसण्याची खात्री होते.

चित्तवेधक ख्रिसमस पार्टी लुकसाठी, अभिनेत्री आणि केजे ब्रँड अॅम्बेसेडर वामिका गब्बीकडून प्रेरणा घ्या. एक सुंदर आणि मोहक डायमंड नेकलेस सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेईल. कोणत्याही पार्टीत तो तुम्हाला चमकवेल आणि तुम्ही खऱ्या तारकेप्रमाणे चमकाल. नेकलेसला चमकदार डायमंड ड्रॉप इअररिंगची जोड द्या. लुक पूर्ण करण्यासाठी दोन सिंगल डायमंड बांगड्या घाला. मोहिनीची भर घालण्यासाठी तुम्ही हिरेजडित बांगड्या देखील वापरून पाहू शकता. तो रंग उठून दिसण्यासाठी काँट्रास्ट पन्ना रत्नांनी जडलेल्या डायमंड स्टेटमेंट रिंग्सची निवड करा. या लूकद्वारे, तुमचा अभिजात दिमाख परिपूर्ण होईल!

पोल्की ज्वेलरीचे कोणत्याही प्रसंगी एक विशेष स्थान असते आणि गुजराती अभिनेत्री आणि केजे ब्रँड अॅम्बेसेडर किंजल राजप्रिया तिचा दिमाख अतिशय सफाईने दाखवते. तुमचा लुक वाढवण्यासाठी एक सुंदर कुंदन नेकलेस मॅचिंग कानातल्यांसोबत घाला. तुम्ही परिधान करू इच्छित असलेल्या पारंपारिक पोशाखात काँट्रास्ट रंगीत दागिने घालून तुमचा लुक वाढवा. ते केवळ लक्ष्यवेधी ठरणार नाही, तर ते ठळक आणि सुंदर असल्याचा सुंदर आभास निर्माण करेल. प्रत्येक हातामधे मीनाकारी किंवा कुंदन डिझाइनमध्ये एकच कडे आणि ठळक अंगठी घाला आणि तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये चमकण्यासाठी तयार आहात.

या सुट्टीच्या मोसमात, तुमच्या मनातली गोष्ट दागिन्यांना बोलू द्या आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या शैली निवडींपासून प्रेरणा घ्या. तुम्‍हाला मिनिमल लुक ठेवला आहे, चोकर ट्रेंड करुन पाहत आहात, सोनेरी ग्लॅमर किंवा डायमंड डिलाइट्स, ठळक अंगठी, बांगड्या किंवा पोल्‍की ज्‍वेलरीची शाश्वत अभिजातता जोडण्‍याची तुम्‍हाला इच्‍छा असल्‍यास, तुमच्यासाठी प्रत्‍येक आवडीनुसार सेलिब्रेटी-प्रेरित शैली आहे. तर, व्हा पुढे, तुमच्या खरोखर व्यक्तिमत्वानुसार ताऱ्यासमान चमकत राहा आणि त्या हॉलिडे पार्ट्यांमध्ये सर्वांचे लक्ष्य बना!