Kalyan Jewellers India Limited - Articles

हंगामातील सर्वात आनंदी- ख्रिसमससाठी ज्वेल अप करा - कल्याण ज्वेलर्सची शिफारस

Publisher: blog

ग्लॅम होण्याचा हाच हंगाम आहे!

आनंददायक दिवे, सणाचा आनंद आणि हवेत रेंगाळणाऱ्या कॅरोल्ससह, ख्रिसमसचा हंगाम अखेर आला आहे. आणि ग्लॅम अप आणि ध्रुव ताऱ्यासारखे तेजस्वी चमकण्यासाठी याहून कोणती चांगली वेळ आहे? तुम्हाला पुढील सणांसाठी सज्ज करण्यात मदत करण्याकरिता आमचे खास ख्रिसमस संकलन इथे दिले आहे.

तुमच्या आवडत्या पोशाखात ख्रिसमसच्या हंगामात सोने, दिमाख आणि चमक दाखवा. अद्याप काय जोडायचे हे ठरवण्याचा प्रयत्न करीत आहात? आनंददायक खेळकर उत्सवासाठी या अॅक्सेसरी मार्गदर्शकाची मदत घ्या.


पार्टी कुठे आहे?

दागिन्यांची तुमची निवड ठिकाणासोबत जुळली पाहिजे. ही ऑफिस पार्टी आहे की कुटुंब की मित्रांसोबत आहे? ऑफिस ख्रिसमस पार्टी असल्यास, एक मोहक सिल्हूट ड्रेस काही नजरा वळवेल. चमकदार हिऱ्याच्या दागिन्यांनी ऍक्सेसराईझ करा- एक आकर्षक डायमंड नेकलेस, डायमंड स्टड्स आणि डायमंड टेनिस ब्रेसलेट इव्हेंटसाठी आकर्षक दिसतील. पँट आणि सूट तुमची अधिक पसंतीची स्टाइल असल्यास, पातळ सोन्याच्या बांगड्यांच्या क्लस्टरसह आणि हातांसाठी ब्लिंग घड्याळ घालून जोड द्या. कानांसाठी सोन्याचे मोठे हुप्स वापरून पाहा. लुक अधिक खुलून दिसण्यासाठी तुम्ही लांब लेयर्ड मिनिमलिस्टिक नेकपीस घालणे निवडू शकता.

मित्रांमध्ये असताना ख्रिसमस आनंदमयी खास असतो. ड्रेसींग करण्यासाठी एक संकल्पना निवडा. तुम्ही हंगामाच्या रंगछटांमध्ये समन्वय रंगवू शकता किंवा ख्रिसमस प्रिंट पीजेमध्ये हँग आउट करू शकता. अभिजात आणि स्टायलिश संकल्पनेसाठी खूप तयारीची गरज असते. तुमचे चमकणारे सिल्क आणि चमचमीत सेक्विन केलेल्या पोषाखाला जुळणार्‍या दागिन्यांची भर द्या. सिल्व्हर आणि कूल-टोन्ड (निळे आणि जांभळ्यासारखे) पोशाख रोज गोल्ड आणि प्लॅटिनम दागिन्यांसोबत अपवादात्मकपणे चांगले दिसतात. पोशाखासोबत जुळण्यासाठी रत्नजडित बांगड्यांसह प्रसंगासाठी ठसठशीत इअरड्रॉप्स निवडा.

जर तुम्ही तुमच्या पोशाखासाठी सोनेरी आणि रंगीबेरंगी रंगांचे (लाल आणि हिरवे) उबदार टोन निवडत असाल, तर आमच्या मते सोने नक्की निवडा! या दिवशी ऍक्सेसराईज करण्यात संकोच करु नका. माणिक आणि पन्नाजडित हार तुमच्या पोशाखाला उत्तम प्रकारे जुळतील. त्‍याला समान कानातले, एकतर स्‍टड किंवा लांब ड्रॉप्सची जोड द्या. दमदार आणि चमकदार पन्ना किंवा लहान हिऱ्यांनी वेढलेले माणिक यासारखी ठसठशीत अंगठी निश्चितपणे काहीजणांचे श्वास रोखेल.

आता तुम्हाला काय परिधान करावे आणि ऍक्सेसराइझ कसे करावे हे माहित आहे, तेव्हा सजवा स्वतःला, खळाळते स्मित करा आणि उत्सवाच्या हंगामात खुणवणाऱ्या आनंददायी क्षणांमध्ये हरवून जा.

त्या दिवसाकरिता परिपूर्ण दागिना शोधत आहात? कल्याण ज्वेलर्सचे मौल्यवान उत्सव संग्रह पाहा.