My Kalyan Mini Store, Wadagaon Sheri, Pune

Shop No-01, Sharma Building, Near Swami Samartha Temple
Pune- 411014

020-67264851

Call Now

Opens at

Articles

जेम्सची महाराणी म्हणजेच मोत्यांद्वारे सक्षमीकरणाचा संकेत देत पटवून द्या ओळख

On
मोत्यांना ‘जेम्सची महाराणी’ म्हटले जाते आणि ते खरेच आहे. मोती अगदी कोणीही रोज परिधान करत नाही. यासाठी आवश्यक असतो एक ठराविक स्तर आणि दिमाख म्हणजे मोत्यांच्या माळेद्वारे एक अद्भुत लुक देता येतो. भूगर्भातून खोलवर खाणीतून काढलेल्या अन्य दागदागिन्यांच्या तुलनेत, मोती अनोखे असतात कारण ते समुद्राच्या आतून येतात. हे दुर्मिळ खडे गोळा करण्यासाठी समुद्रामध्ये खोलवर बुडी मारुन काढणे याला पर्लिंग म्हणतात. मोती हे एक अद्भुत घटना असतात कारण ते शिंपल्यामधील प्राण्यांद्वारे तयार केले जातात. या शिंपल्यामध्ये धूळ किंवा वाळूसारखा कण शिरतो तेव्हा, त्यातील समुद्री प्रामीण त्या कणाच्या भोवती अनेक वर्षे नेकर नावाचा पदार्थ स्त्रवतो आणि अखेरीस त्यातून चमचमीत मोती तयार होतो. नैसर्गिक पद्धतीने, एक मोती तयार होण्यासाठी अडीच वर्षांहून अधिक काळ लागतो. प्रत्येक मोती हा खास असतो कारण कोणतेही दोन मोती एकच आकार, दिसणे किंवा चमक यामध्ये एकसमान नसतात. स्त्रियांच्या सौंदर्यासाठी मोती युगानुयुगे वापरले जात आहेत. प्राचीन ग्रीक इतिहासापासून ते ईजिप्तचे फारोआ ते बलाढ्य चिनी राजवंशांपासून ते शाही मुघल साम्राज्यापर्यंत, मोत्यांनी शाही खजिन्यामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. राजांच्या नजिकच्या परिचितांना मोती भेट म्हणून दिले जात आणि शाही स्त्रिया भव्य फॅशनमध्ये मोती मिरवत असत. आजही, मोत्यांचे दागिने एखाद्या स्त्रीचं मन आणि तिची वस्त्रे यांच्यामध्ये एक हक्काचं स्थान मिळवून आहेत. मोती हे नाजूक क्रीम्स आणि रसायनांच्या नित्य संपर्कामुळे नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असते, त्यामुळं केवळ विशेष प्रसंगांमध्येच मोती परिधान करावेत. शाही लुक आणण्यासाठी एक साधा पर्ल स्टड देखील पुरेसा असतो. फॉर्मल ऑफिस परिधानासाठी देखील पर्ल स्टड्स चांगले असतात. पर्ल ब्रेसलेट्स किंवा बांगड्या दैनंदिन तत्वावर न वापरणे उत्तम कारण त्यांना चरे पडण्याची शक्यता अधिक असते. भव्य सोहोळ्यासाठी, मोत्यांनी मढवलेली चांदबाळी ईअररिंग्ज घ्यावी हे उत्तम. नववधूच्या दागिन्यांमध्ये सोने आणि हिऱ्याचे दागिने सर्वाधिक असले तरी मोत्यांच्या दागिन्यांची स्वतःची जागा या निमित्त हमखास असते. भव्य चोकर्सपासून ते लेयर्ड लांब नेकलेसेसपर्यंत, पर्ल ज्वेलरीने एका क्षणात भव्यता आणता येते. याउलट, मोत्यांची एक साधी माळ एक दर्जेदार आणि दिमाखदार लुक देऊ शकते, एखाद्या फॉर्मल मेळाव्यासाठी अगदी योग्यरित्या. पर्ल ज्वेलरीचा एक रोचक पैलू म्हणजे प्रत्येक प्रसंगाला अनुकूल आणि प्रत्येक व्यक्तिच्या पसंतीनुसार त्याची स्टाईल, सर्वात शक्य त्या चार्मिंग पद्धतीने करता येते.
Publisher: Kalyan Jewellers

नववधूचे दागिने निवडण्यासाठी बिगीनर्स गाईड

On
भारत अनेक गोष्टींसाठी सुप्रसिद्ध आहे. यामध्ये सर्वात वरच्या स्थानी असतात आपले विवाह सोहळे आणि तो साजरा करण्यातील भव्यता. भारतीय विवाहांमध्ये दोन-एक हजार लोकांच्या सुशोभित गर्दीमधून नववधू ओळखणं आश्चर्यकारकरित्या सोपं असतं. याचं कारण तिचा भव्य आणि सुंदर परिधान सोबत दागिन्यांचा लक्षवेधी संच. नववधूची स्टाईल करताना योग्य दागिने निवडणे आणि घालणे अतिशय महत्वाचे असते. म्हणून नववधूच्या दागिन्यांवर अनेक वर्षांची बचत खर्च करण्यापूर्वी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? चला पाहूया. नेकलाईन वि. नेकलेस सर्वसामान्य उत्तर भारतीय विवाहामध्ये, नववधू बरेचदा चमचमीत लेहेंगा परिधान केलेली असते सोबत भरपूर बारीक नकाशीचे डिझाईन्स स्टोन्स आणि रेशीम धाग्यांनी विणलेले असतात. हा पोषाख बोट नेक ते स्वीटहार्ट नेकलाईनपासून ते प्लंजिंगवाल्या कोणत्याही नेकलाईनद्वारे डिझाईन करता येतो. लग्नाच्या पोषाखासोबत एक चोकर, लांब नेकलेस किंवा या दोन्हींचा संयोग करणे महत्वाचे असतात. खूप भरजरीत आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग सेक्वीन्स आणि हिऱ्यांनी झाकण्याने तुम्ही केवळ एक डिस्को बॉलसारखे दिसाल. पोषाख तसंच तुम्हालाही सौंदर्य देईल असे दागिने निवडण्याची खात्री करा. मेटल्सचे रुचिपूर्ण मिश्रण करा सोने, प्लॅटीनम, व्हाईट गोल्ड, रोज गोल्ड इ. पासून निर्मित दागिन्यांचे मिश्रण केल्याने तुम्ही गबाळे दिसाल असा एक सर्वसाधारण समज आहे. पण त्यांची हुशारे आणि रुचिपूर्ण जोड करणे नेहमीच हिट ठरते. तुमचे मेटल्स काळजीपूर्वक मिसळा आणि तुम्हाला अभूतपूर्व ब्रायडल लुक मिळेल. रंग मिसळू नका विविध रंगांचे जेमस्टोन्स ठळक असतात आणि योग्य पोषाखासोबत जोडल्यास एक सुंदर छटा मिसळली जाते. पण एका सिंगल लुकसाठी अनेक रंग परिधान करणे चांगले नाही. उदा., तुमच्या लग्नाच्या ड्रेसची शेड पेस्टल असेल तर, एक साधा ठळक रंगाचा जेमस्टोन दागिना घाला. ठळक ब्रायडल पोषाखासाठी, एक सौम्य रंगीत जेमस्टोन दागिना चांगला शोभून दिसेल. तुमच्या विवाहाच्या पोषाखाला पूरक दागिना निवडा विवाहाचा पोषाख भव्यदिव्य असतो तेव्हा, त्याचं सौंदर्य आणि भव्यता उठून दिसेल असा दागिन्यांचा एक साधा संच निवडणे उत्तम. याउलट, तुमचा विवाहाचा पोषाख साधा असेल तर, ठसठशीत आणि मोठे दागिने निवडे जे एक संपूर्ण भव्य भारतीय ब्रायडल फिनिश देतील. महत्वाच्या दिवशी तुमचे सर्व दागिने घालू नका भव्य भारतीय नववधूला परिपूर्णता देताना, तुमची दागिन्यांची संपूर्ण पेटी रिकामी करुन ते सर्व परिधान करण्याची गरज नाही. म्हणून योग्य दागिने निवडा आणि त्यांना कलात्मक पद्धतीने जुळवून एक परिपूर्ण ओवरऑल लुक द्या. काहीवेळेस एखाद्या विशिष्ट लुकसाठी भरपूर दागिने उतरवून ठेवणेच इष्ट. विवाहाच्या सोहळ्याच्या पलिकडे विचार करा विवाह सोहळा काही दिवस टिकणारा असतो पण दागिने पिढ्यान् पिढ्या टिकणारे असतात. म्हणून एखादा दागिना घेण्यापूर्वी ते अन्य पोषाखांसोबत पुन्हा वापरणे आणि जुळवण्याचा विचार करा. तुमचा लेयरिंग गेम समजून घ्याः दक्षिण भारतीय ब्राईड स्पेशल एक सर्वसामान्य दक्षिण भारतीय नववधू सामान्यतः कुरकुरीत रेशीम साडी आणि चोकर्सपासून ते अखूड नेकलेसेस पासून ते लांब नेकलेसेसपर्यंत नखशिखांत मढलेली असते. अनेक नेकलेसेस सुंदररित्या मांडणे महत्वाचे असते कारण त्यावर एखादा लुक तयार होईल किंवा बिघडेल ते ठरते. दिवसाच्या अखेरीस, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही, म्हणजे नववधूला, तुम्ही निर्माण केलेला लुक आवडला पाहिजे. म्हणून स्वतःचा विचार करा आणि तुम्हाला आनंद देणारे दागिने निवडा. एक सुंदर नववधू होण्याची क्रिया आपोआपच घडेल.
Publisher: Kalyan Jewellers

Can we help you?