My Kalyan Mini Store, Vikhroli, Mumbai

1, Adrsh Chs Ltd, Building No-54, Station Road
Mumbai- 400083

022-61739701

Call Now

Opens at

<All Articles

विंटेज ट्रेंड्सः परत येत आहेत का?

“जुने ते सोने”. या म्हणीपेक्षा दुसरी कोणतीही लोकप्रिय आणि वारंवार वापरली जाणारी म्हण नाही. तरीही, हे विधान यापूर्वी इतके सत्यात कधीच उतरले नव्हते. विशेषतः फॅशन उद्योगामध्ये ट्रेंड्स अगदी डोक्याची टोपी बदलल्यासारखे बदलत असतात, तिथे असे अनेक ट्रेंड्स असतात ज्यांनी आपला क्रम आचरताना, फारसे लक्षवेधी ठरले नाही परंतु कालांतराने अतिशय लोकप्रिय ठरले.
विंटेज ज्वेलरीचा विचार करता, हे खचितच नैसर्गिक आहे की आपल्या पूर्वजांनी वापरलेली ज्वेलरी स्टाईल आजकाल ट्रेंड्स होत आहे. याचं कारण कलाकारांची बारीक हस्तकला जी डिझाईन्स आणि दागिने त्रिकालाबाधित सुंदर बनवते. असे दागिने स्त्रियांना अतिशय आवडण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पिढ्यान् पिढ्या हस्तांतरित होत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांमागे गुंफलेल्या भावना. दुर्मिळ अँटीक डिझाईन्ससोबत, दागिन्यांवर गोड आठवणींचे वजन असते जे प्रत्येक स्त्री तिची आई/आजी यांच्यासोबत जोडत असते. आजच्या विश्वामध्ये फॅशनेबल असलेल्या काही लोकप्रिय विंटेज दागिन्यांवर एक नजर टाकूया.
जबरदस्त चोकर्स आणि नेकलेसमध्ये कलात्मक पद्धतीने गुंफलेल्या शुद्ध, मूळ स्वरुपातील हिऱ्यांचा वापर केलेल्या पोलकीसारखे अनकट दागिने आज कोणत्याही वधूला हमखास हवे असतात. याचं कारण पोलकी दागिने, सर्वात सुंदर पद्धतीने, सर्वांचं लक्ष वधूकडे आकर्षिक करण्याइतके भव्य असतात.
कोणत्याही महिलेसाठी सदैव पसंतीचा आणखी एक दागिना म्हणजे झुमका/जिमिकी/कोडा कडुक्कन. अनेक शतकांपासून संपूर्ण भारतात परिधान केल्या जाणाऱ्या, या प्रकारच्या ईअररिंग्ज खऱ्या अर्थाने अमर्त्य आहेत कारण त्यांचा आरंभ झाल्यापासून सर्व वयाच्या स्त्रियांसाठी त्या सर्वात आवडीचा दागिना बनले आहेत. अनेक निर्माते आणि फॅशन पंडितांनी साध्या झुमक्यामध्ये क्रांती घडवून विवाह परिधानापासून ते दैनंदिन परिधान आणि अगदी वेस्टर्न कपड्यांपर्यंत कोणत्याही परिधानाला जुळतील असे झुमके बनवले आहेत.
कडा बँगल्स म्हणजे हिरे आणि मौल्यवान खडे जडवलेल्या चमकदार सोन्याच्या बांगड्या. त्या मोठ्या असतात आणि सामान्यतः जोडीने किंवा केवळ एक अशा परिधान केल्या जातात. हातभर बांगड्या महिला घालत असत ते दिवस आता गेले. कमीतकमी तरीही परिपूर्ण दागिने घालवण्याचा काळ असल्यानं स्त्रियांमध्ये कडा बँगल्सचं हे प्रेम पुन्हा बहरलं आहे.
आजकालच्या स्त्रियांमध्ये आणखी एक आवडीचा दागिना म्हणजे नोज रिंग. मोठ्या कलात्मक रिंग्जपासून ते स्टार स्टडेड बारीक हिऱ्यांच्या रिंग्जपर्यंत ते वेस्टर्नाईज्ड डिझाईन्सपर्यंत, नोज रिंग्जचे सर्व पॅटर्न्स ट्रेंडमध्ये आहेत.
मांग टिका म्हणजे सामान्यतः एक इंचभर कलात्मक सोन्याचे पेंडंट असते काहीवेळेस त्यात हिरे जडवून बारीक डिझाईन केले जाते. विवाहित स्त्रियांच्या मंगळसूत्रामध्ये ते गुंफले जाते. प्रामुख्याने उत्तर भारतीय स्त्रियांद्वारे परिधान केला जाणारा, हा दागिना आता सर्व भारतीय स्त्रियांमध्ये लोकप्रिय झालेला आहे.
विंटेज आणि अँटीक दागिन्यांचा विचार केला तर असे अनेक अद्भुत डिझाईन्स भारतीय खजिन्यामध्ये आहेत. मी या लेखामध्ये केवळ सर्वात सुप्रसिद्ध दागिन्यांचा उल्लेख केला आहे कारण संपूर्ण यादीच खरोखर न संपणारी आहे.

Can we help you?