My Kalyan Mini Store, Ranjangaon, Pune

Shop No-01, Ward No-1, 1st Floor, Shree Ganesh Propeties, Pune Nagar Highway
Pune- 412220

020-67264896

Call Now

Opens at

Articles

मिलेनियल्सच्या प्राधान्यांमुळे दागिन्यांचे ट्रेंड्स कसे बदलले आहेत?

On
मिलेनियल्स म्हणजे सध्याच्या पिढीमधले कमावते लोक आहेत. 25-40 वर्षे या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याच्या वयोगटात असलेले हे लोक कोणत्याही अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. मिलेनियल्सची मोठी लोकसंख्या असलेला भारत हा एक तरुण देश आहे. नव्याने कमवायला लागलेले असल्यामुळे या लोकांना गुंतवणुकीत स्वारस्य असते. अशावेळी, सोने हा कोणत्याही पिढीसाठी एक सुरक्षित आणि सर्वांत जास्त वापरला जाणारा पर्याय आहे. मिलेनियल्सचा फॅशनचा आणि दागिन्यांचा सेन्ससुद्धा चांगला आहे, त्यामुळे ते आपली स्टाईल, आवड आणि ट्रेंड यानुसार सोन्याचे दागिने खरेदी करून एका दगडात दोन पक्षी मारू शकतात. सध्या ट्रेंडमध्ये असलेले काही दागिने म्हणजे अनेक पदरी चेन्स, मोत्याचे दागिने, वजनाला हलके हिऱ्याचे दागिने, तुमच्या आवडत्या रंगाचे हिऱ्याचे दागिने आणि अशाप्रकारचे अनेक दागिने. मिलेनियल्समध्ये जास्त दिसणारा अजून एक प्रकार म्हणजे मिनीमॅलीस्टिक स्टायलिंग. आजकालच्या अनेक तरुणांच्या जीवनशैलीमध्ये हे स्वीकारले जाते. नैसर्गिकरीत्याच दागिन्यांचे स्टायलिंग करतानासुद्धा हीच आवड समोर येते. त्यांना अनेक दागिने विकत घ्यायला आवडतात पण अॅक्सेसरीज घालताना त्यांना मिनीमॅलीस्टिक दृष्टीकोन आवडतो. सोन्याच्या दागिन्यांमध्ये मिनीमॅलीस्टिक डिझाईन उदा. साधे टसल हिऱ्याचे इअररिंग्ज, हलके आणि फॅन्सी रोज गोल्डचे दागिने, साधे मोत्याचे स्टड्स, मोत्याचे नेकलेसेस, फॅन्सी पेंडंट असलेल्या हलक्या चेन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. “कमी म्हणजेच जास्त” या मंत्रानुसार त्या नजरेत येणार नाहीत अशाप्रकारे मिक्स आणि मॅच केल्या जातात. भौमितिक पॅटर्न असलेले दागिनेसुद्धा सध्या लोकप्रिय आहेत, स्टड्स, ड्रॉप्स, हिऱ्याच्या इअररिंग्ज, पेंडंट्स किंवा ब्रेसलेट्स यामध्ये भौमितिक पॅटर्न असलेल्या डिझाईनला जास्त मागणी आहे कारण ते कोणत्याही प्रकरच्या पोशाखावर खुलून दिसतात, मग तो कॅज्युअल डे आऊट असो किंवा बिझनेस मिटिंग असू दे. हया मिनीमॅलीस्टिक दागिन्यांचे स्टायलिंग करण्याचा एक आकर्षक मार्ग म्हणजे त्यांचे स्टॅकिंग करणे. जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या स्त्रियांपासून ते क्रिस्प बिझनेस सूट्स घातलेल्या स्त्रियांपर्यंत, कोणीही हया लूकमध्ये तुम्हाला दिसेल. गळ्याभोवती अनेक बारीक चेन्स अशा कलात्मक पद्धतीने घातल्या जातात की त्या फार भडक दिसल्या नाहीत तरीही त्यामुळे लोकांचे लक्ष क्षणार्धात वेधून घेतले जाते. हीच स्टाईल ब्रेसलेट्स आणि बांगड्या घालून करता येते. वधूच्या वेशभूषेचा विचार केला जातो तेव्हा, सर्वांत महत्त्वाचा मिलेनियल्सचा गुणधर्म दिसून येतो तो म्हणजे शाश्वतता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलेले व्हिंटेज दागिने म्हणजे भावना गुंफलेला एक सुंदर प्रकार असतो. जेव्हा एखादी वधू इअर रिंग्ज, ब्रेसलेट्स, बांगड्या, अंगठ्या किंवा नेकलेसेस असे सुंदर रंगांचे हिऱ्यांचे दागिने घालते तेव्हा तिचा फॅशन सेन्स आणि व्यक्तिमत्व त्यातून उठून दिसते. आपला फॅशन सेन्स आणि आवडी यामध्ये प्रत्येक पिढी क्रांती घडवत असते. ते घालत असलेले पोशाख आणि दागिने यातून ते सर्वोत्तम पद्धतीने दिसून येते.
Publisher: Kalyan Jewellers

दागिन्यांचे स्टायलिंग – तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवण्याचे साधन

On
आपले इतरांपेक्षा असलेले वेगळेपण आणि आपले वैशिष्ट्य म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व. आपण ज्या प्रकारे विचार करतो, कृती करतो, बोलतो आणि स्वत:ला सादर करतो. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व दिसून येते. एखाद्याचे व्यक्तिमत्व खुलवण्याचा एक सर्वांत सोपे आणि सर्वांत ठळक साधन म्हणजे पोशाख निवडणे आणि त्याला शोभतील असे योग्य मॅचिंग दागिने निवडणे. एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या स्थितीत, तिच्या पोशाखानुसार वेगवेगळे रूप दिसते. उदाहरणार्थ, लग्नासाठी पोशाख करणे हे सुट्टीसाठी किंवा बिझनेस मिटिंगसाठी पोशाख करण्यापेक्षा नक्कीच वेगळे असते. पण सर्व वेशभूषा योग्यप्रकारे केल्यास, त्यातून त्या व्यक्तीचे नैसर्गिक व्यक्तिमत्व चमकू शकते. जेव्हा अॅक्सेसरीजचा विषय येतो तेव्हा, एखाद्या व्यक्तीची तिचे व्यक्तिमत्व, वैयक्तिक प्राधान्य आणि सध्याच्या ट्रेंड यानुसार स्टाईल करणे अतिशय रंजक असते. सहजपणे कोणाशीही संवाद साधू शकणाऱ्या आणि दिलखुलास हसणाऱ्या व्यक्तीने इकडे तिकडे आनंदाने फिरताना टसेल इअररिंग्ज किंवा आनंदाने हलका आवाज करणारे झुमके घातले तर ते नैसर्गिक दिसतात. बिझनेस मिटिंगमध्ये असताना सगळ्या बोर्ड रूमचे लक्ष वेधून घेणारा तुमचा आत्मविश्वास आणि तेज फाईन ज्वेलरीमुळे अजूनच वाढते. मोत्याचे स्टड्स, साधे पण लक्षवेधक सोबर ब्रेसलेट्स, भौमितिक पॅटर्न असलेले हलके ऑफिसवेअर दागिने हे प्रसंगानुरूप वापरण्यासाठी काही पर्याय आहेत. पारंपरिक दागिने नेहमीच क्लासी दिसतात. पारंपरिक पोशाख घालून त्यावर साधे पण पारंपरिक दागिने घालणे तुम्हाला शोभून दिसेल. आजच्या मिलेनियल्सना मिनीमॅलीस्टिक पद्धतीने बनवलेले आणि आधीच्या पिढीने या पिढीकडे सोपवलेले शाश्वत जुने दागिने आवडतात. कलात्मक दृष्टी असलेल्या व्यक्तीला कशातूनही प्रोत्साहन मिळते, आकाशाच्या रंगापासून ते आधुनिक कलेच्या रंगांपर्यंत, कोणतीही गोष्ट कलात्मक मनासाठी एक प्रेरणा स्रोत असू शकते. ते त्यांच्या दागिन्याच्या स्टायलिंगमधूनसुद्धा दाखवता येते. पारंपरिक अँटीक दागिन्यांपासून ते आधुनिक फॅन्सी दागिन्यांपर्यंत, मोठ्या पेंडंटपासून ते स्टेटमेंट पिसेसपर्यंत ते रोज घालण्याच्या सध्या हलक्या दागिन्यांपर्यंत; चमकणाऱ्या ठसठशीत हिऱ्यांच्या दागिन्यांपासून ते साध्या मोत्याच्या सरापर्यंत कलात्मक व्यक्तीला यातील कोणतेही दागिने खुलून दिसतात आणि त्यातूनसुद्धा त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा पसर्नल टच लक्षात येतो. विवाह सोहळा असो किंवा पार्टी, कोणत्याही ठिकाणी गेल्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकणाऱ्या अतिशय आत्मविश्वास असलेल्या स्त्रिया स्टेटमेंट पिसेस घालतात. या उलट, अंतर्मुख व्यक्ती सर्वांत आकर्षक पण नजरेत येणार नाही अशाप्रकारे शांत सौंदर्य प्रतिबिंबित करेल अशा पद्धतीने कधीकधी लहरी वाटेल असासुद्धा पोशाख करते. जितक्या प्रकारची व्यक्तिमत्वे असतील तितक्याच प्रकारचे स्टायलिंगचे दागिने आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्याप्रमाणे प्रत्येक स्टायलिंगसुद्धा वेगळे असते आणि आपापल्यापरीने सुंदर असते.
Publisher: Kalyan Jewellers

Can we help you?