My Kalyan Mini Store, Pimpri Chinchwad, Pune

19, Ward No-19, Empire Estate, Mumbai Pune Highway Road
Pune- 411033

020-71970033

Call Now

Opens at

Articles

उन्हाळा-वसंत ऋतूतील लग्नाच्या दागिन्यांचे ट्रेंड्स

On
पाश्चात्य देशांमध्ये आणि पाश्चात्य परंपरांमध्ये वसंत ऋतूमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये विवाह सोहळे जास्त प्रचलित असले तरीही हा ट्रेंड आता भारतीय विवाहांमध्येसुद्धा दिसू लागला आहे. दक्षिण भारतात वर्षभर आनंददायक विषुववृत्तीय हवामान असते. मात्र उत्तर भारतात हिवाळ्यात जास्त थंडी असल्यामुळे आणि उन्हाळ्यात जास्त उकाडा असल्यामुळे तिथे या ट्रेंडचे स्वागत करण्यात आले आहे. नेहमीच्या उत्तर भारतातील लग्नामध्ये बारात, संगीत असे अनेक कार्यक्रम घराबाहेर केले जातात. त्यामुळे हिवाळ्यात नातेवाईकांना छान, उबदार वाटण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात, या उलट उन्हाळ्यातील किंवा वसंत ऋतूतील लग्नांमध्ये लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना आपली स्टाईल आणि फॅशन सेन्स अधिक मिरवता येईल. वधूच्या दागिन्यांमध्ये अनेक प्रकारचे दागिने नेहमीच ट्रेंडमध्ये असले तरीही, मोठा पोलकी चोकर सेट, मोठे झुमक्याचे कानातले, ठसठशीत आणि चमकणारे चांद बाली कानातले इ. प्रकारचे दागिने उन्हाळा-वसंत ऋतूतील लग्नांमध्ये ट्रेंडी बेंचमार्क सेट करतात. उन्हाळा-वसंत ऋतूतील लग्नाचा लूक स्टाईल करण्यासाठी फ्लोरल पॅटर्न ही सामान्यपणे चांगली निवड असते. फ्लोरल डिझाईन असलेले गडद रंगाचे लेहेंगे आणि त्यावर मोत्याचे, हिऱ्याचे किंवा पेस्टल रंगाचे कुंदन किंवा पोल्की सेट्स यापासून ते साधे पेस्टल रंगाचे लेहेंगे आणि त्यावर मोठे, चमकणारे आणि ठसठशीत नेकपिसेस यापर्यंत वधूसाठी स्टायलिंगचे असंख्य पर्याय आहेत. उन्हाळा-वसंत ऋतूतील लग्नांना अजून एक खास टच देणारे आणखी काही दागिने म्हणजे ड्युएल फिंगर रिंग्ज, पेस्टल किंवा फ्लोरल डिझाईन, फ्लोरल चिन्हे असलेली कलात्मक ब्रेसलेट्स. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांकडे असलेला दुसरा सुंदर पर्याय म्हणजे हलके आणि ब्रीझी रोझ गोल्ड दागिने. विवाह म्हणजे दोन कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या प्रेमाचा उत्सव. अशा प्रसंगांचा महत्त्वाचा भाग म्हणजे कुटुंबातील वंश परंपरेने चालत आलेले दागिने. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिल्या जाणाऱ्या हिऱ्याच्या किंवा सोन्याच्या दागिन्याला मोठे भावनिक मूल्य असते. इतकेच नव्हे तर अशा दागिन्यांची डिझाईन्ससुद्धा दुर्मिळ असतात त्यामुळे ते सर्व पिढ्यांमध्ये ट्रेंडी दिसतात. भावनिक मूल्य असलेल्या अशा दागिन्यांशिवाय कोणताही विवाहाचा लूक अपूर्ण असतो. लग्नाचा लूक स्टाईल करण्यामध्ये शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक आवड महत्त्वाची असते. वधू, वर आणि लग्नाला आलेले सर्व पाहुणे केवळ सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर स्वत:ला आनंदी करण्यासाठी नटत असतात. हा निकष पूर्ण करणारा कोणताही लूक नेहमीच ट्रेंडी आणि सुंदर असतो.
Publisher: Kalyan Jewellers

पुरुषांसाठी दागिने

On
सामान्यपणे दागिन्यांची बाजारपेठ जरी स्त्रियांवर केंद्रित असली तरीही पुरुषांच्या दागिन्यांमध्येसुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्राचीन भारतामध्ये विविध राज्यांमधील लोक त्यांच्या सामाजिक दर्जानुसार वेगवेगळे दागिने घालत असत. राजे, राजपुत्र, राज दरबारी माणिक, मोती आणि इतर रत्ने चांदीच्या किंवा सोन्याच्या धाग्यांमध्ये गुंफून घालत असत तर सामान्य जनता इतर स्वस्त खडे तांब्याच्या धाग्यांमध्ये गुंफून घालत असे. माणके जडवलेल्या सोन्याच्या मुकुटापासून ते सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या कर्णभूषणांपासूनते तलवारीची म्याने सजवण्यासाठी वापरलेल्या सोन्याच्या साखळ्या आणि नेकलेसेसपर्यंत प्राचीन भारतातील पुरूष अनेक वेगवेगळ्या ॲक्सेसरीज वापरत असत. भारतावरील ब्रिटीश राजवटीच्या प्रभावानंतर पुरुषांच्या फॅशनमध्ये क्रांती झाली आणि वापरले जाणारे दागिने अगदी कमी झाले. अनेक पिढ्या गेल्या तशा पुरुषांच्या फॅशनमधील स्टाईल आणि ट्रेंडमध्येसुद्धा अनेक बदल झाले.आज सूट आणि ट्राऊझर्ससारख्या फॉर्मल कपड्यांवर सोन्याची किंवा प्लॅटिनमची ब्रेसलेट्स, कलाकुसर केलेली सुंदरप्लॅटिनम कफलिंक्स आणि सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या साध्या अंगठ्या असे दागिने घातले जातात. वेडिंग बँड हा अजून एक पुरुषांकडून सर्वांत जास्त घेतला जाणारा दागिना आहे. वेडिंग बँड साधे असले तरी त्यामध्ये पुरुषांकरता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोने, प्लॅटिनम, दोन्ही धातूंचे मिश्रण किंवा त्यामध्ये छोटे हिरे जडवून किंवा न जडवता असे वेडिंग बँडमधले काही पर्याय आहेत. अनेक पुरुष फॉर्मल कपड्यांवर एथनिक कपड्यांवर घालण्यासाठी हिऱ्यांच्या स्टडचीसुद्धा निवड करतात. एथनिक कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर अॅक्सेसरीजचे पर्याय जास्त आहेत.शेरवानीवर मोठ्या मोत्यांचा किंवा रत्नांचा नेकलेस किंवा पांढरे धोतर आणि पांढऱ्या शर्टवर वाघनखांचे पेंडंट असलेली सोन्याची चेन, वेगवेगळ्या प्रकारची सर्व नऊ मौल्यवान रत्ने जडवलेली नवरत्न अंगठी आणि ही यादी कितीही वाढवता येईल. शेवटी स्वतःला कसे सजवायचे दागिन्यांसह किंवा दागिन्यांविना ही प्रत्येक व्यक्तीची निवड आहे. फॅशन ट्रेंड्समधील बदलानुसार आणि महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या प्राधान्यानुसार दागिने वापरून पुरुषांचे अतिशय देखणेपणाने स्टायलिंग करता येते.
Publisher: Kalyan Jewellers

Can we help you?