My Kalyan Mini Store, Koregaon Bhima, Pune

2, Ward No-5, Nagar Road, Mayur Complex
Pune- 412216

020-67082615

Call Now

Opens at

Articles

तीजसाठी सज्जता, बँगल्स एडिशन

On
मॉन्सूनचे आगमन म्हणजे उत्तर भारतातील स्त्रियांसाठी मोठ्या आनंदाचा क्षण असतो. कारण जुलै ते सप्टेंबर हे महिने तीजचा उत्सव घेऊन येतात. नेपाळ आणि ईशान्य भारतातील हिंदूद्वारे प्रामुख्याने साजरी केला जाणार तीज हा उत्सव रंग, धमाल आणि सलोखा यांनी भरलेला असतो. तीजचा उत्सव उत्तर आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये देखील साजरा केला जातो. तीजचे तीन प्रकार आहेत. हरियाली तीज, श्रावणाच्या महिन्यातील पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते, कजरी तीज भाद्रपद या हिंदु महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते आणि हरितालिका तीज, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. तीजचा उत्सव हिंदू देवता पार्वती आणि हिंदू देव शीव यांच्या संयोगाचा आनंद व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. देवी पार्वती कठोर तप केल आणि भगवान शिवसोबत विवाह करण्यासाठी 108 वेळा जन्म घेतला. तरुण स्त्रिया चांगला जोडीदार मिळण्यासाठी देवी पार्वतीची प्रार्थना करतात आणि विवाहित स्त्रिया या पवित्र दिनी त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. कोणत्याही भारतीय उत्सवाप्रमाणे, तीजमध्ये रंगांचा समावेश असतो आणि आनंद आणि सलोख्याचे ते प्रतीक आहे . महिला आणि तरुण मुली त्यांच्या हातांवर बारीक मेहंदीची नक्षी काढतात आणि गडद किरमिजी, नारंगी आणि हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करतात जी सुबत्ता आणि वृद्धिची प्रतीक आहेत. काही स्त्रिया त्यांची प्रार्थना ऐकली जावी म्हणून या पवित्र दिवशी उपवास करतात. पूजेची प्रथा आणि पवित्र प्रसाद चढवल्यानंतर, जमा झालेल्या सर्व स्त्रिया एकमेकांना मिठाई देतात आणि गाणी तसच नृत्य यांच्याद्वारे हा प्रसंग साजरा करतात. या दिवशी घेवर हा लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ बनवला जातो. मधमाशांच्या पोळ्यासारखा हा पदार्थ असतो आणि त्यात बारीक सुका मेवा आणि घट्ट दूध घालून तो खाल्ला जातो. कोणत्याही भारतीय उत्सवाप्रमाणे, तीज उत्सवात देखील दागिन्यांचे खूप महत्व आहे. महिला पारंपरिक भारतीय पोषाख परिधान करतात आणि कपाळावर मांग टिक्कापासून ते दोन्ही पायांमध्ये पैंजणापर्यंत विविध रंगी मॅचिंग दागिने घालतात. विविध प्रकारचे नेकलेसेस, साखळ्या आणि सोने किंवा हिऱ्यांनी बनविलेल्या मॅचिंग कानातील कुड्या या दिवशी महिला परिधान करतात. हरियाली तीज या दिवशी हिरव्या बांगड्या स्त्रिया हमखास घालतात. हरियाली म्हणजे मराठीत हिरवळ असा अर्थ होतो. निसर्गाची संगोपनाची शक्ती यातून व्यक्त होते. स्त्रिया या प्रसंगासाठी विविध प्रकारच्या हिरव्या शेड्स आणि डिझाईन्सनी स्वतःला मढवतात. हिरव्या किनारीच्या सोन्याच्या बांगड्यांपासून ते एमराल्ड जडवलेल्या बांगड्यांपर्यंत, या प्रसंगसाठी अनेक प्रकारच्या हिरव्या बांगड्या उपलब्ध असतात. भारतासारखा देश यासाठी अनोखा आहे की जगाच्या विविध भागांमध्ये आपण विविध प्रकारचे उत्सव साजरे करत असतो, विविध प्रथा आणि रितींचे पालन करत असतो तरी देखील प्रत्येक आणि हरएक उत्सवाची भावना एकसमानच असते.

Can we help you?