Kalyan Jewellers, Hamdan Street, Abu Dhabi

Shop No-1 & 2, Omeir Bin Yousuf Mosque - Zone 1E3-01
Abu Dhabi- 43680

(971)800-0320969

Call Now

Opens at

<All Articles

भाई दूज - तुमच्या भावंडावरील शाश्वत प्रेमाची कबुली देण्याचा दिवस

भाई दूजसारख्या सणाच्या परंपरेचा स्वीकार करण्यासारखी मोहकता या सणाच्या हंगामात दुसरी नाही. या प्रसंगाचा सहवास अनंत आहे. एक भाऊ आणि बहिणीचा एक सामायिक भूतकाळ असतो जसे की लहानपणीच्या भांडण, तक्रारी आणि मोठ्यांचा हस्तक्षेप, गुपिते शेअर करणे आणि दोन भावंडांमधील संपूर्ण समज यासारख्या आठवणींनी भरलेला. भाऊ आणि बहिणीसारखी काही नाती अनेक टप्प्यांतून जातात, पण बंध कायम घट्ट राहतात. भारतीय परंपरा भाऊ दूज आणि रक्षाबंधन यांसारख्या विशेष दिवसांसह हा बंध साजरा करतात. या दिवशी सभोवतालची प्रत्येक वस्तू सुशोभित केली जाते. हाराने सुशोभित केलेला दरवाजा, तिलकांसह पूजा थाळी किंवा पारंपारिक गोड पदार्थ आणि सुगंधांनी घर भरून जातं आणि भारतीय महिला आणि पुरुष त्यांच्या पारंपरिक पोशाखात आणि आकर्षक दागिन्यांनी स्वतःला सजवतात.
दोन दिवसांच्या दिवाळी उत्सवानंतर भाई दूजचा शुभ प्रसंग येतो. भाई दूज हा बहिणींसाठी त्यांच्या प्रिय भावाच्या दीर्घायुष्य, कल्याण आणि सुबत्तेसाठी देवाकडे प्रार्थना करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून, त्याला ओवाळून, सजवलेल्या थाळीमध्ये स्वादिष्ट पदार्थांसह हा उत्सव साजरा करतात. थाळीमध्ये रोळी, तांदूळ, नारळ आणि दुर्बा यांचा भारताच्या विविध भागांमध्ये पाळल्या जाणार्‍या प्रथेनुसार समावेश असतो. तिलक लावून बहीण प्रेम आणि काळजीचं प्रतीक म्हणून, भावाचं नकारात्मक प्रभावांपासून रक्षण करते. भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन आनंदित करतात. बहिणी त्याला एक सुंदर जेवण वाढतात आणि त्याच्यावर प्रेम आणि भेटवस्तूंचा वर्षाव करतात.
या प्रसंगी दागिने ही तुमच्या भावंडांसाठी सर्वोत्तम भेट आहे कारण त्यांचे मूल्य आणि चमक कधीही कमी होत नाही. इथं भेटवस्तू बंधनाचं प्रतीक असते. भाऊ आणि बहीण जसजसे मोठे होतात तसतसे हा बंध सुंदररित्या पक्व होत जातो. सोन्यापासून हिऱ्याच्या अंगठ्यांपर्यंत, हाताने निर्मित वारसा नेकलेस पासून समकालीन दागिन्यांपर्यंत. दागिने ही तुमच्या भावंडांसाठी एक उत्तम भेट आहे.
सर्व भारतीय सणांप्रमाणे, भाई दूज उत्सव भारताच्या विविध भागांमध्ये भिन्न पद्धतीनं साजरा केला जातो. तथापि, त्याचा गाभा आणि विधी समान श्रद्धा आणि परंपरांची शाखाच आहेत. भाई दूजची इतर नावे आहेत, ज्यात पश्चिम बंगालमध्ये भाई फोटा, महाराष्ट्रातील भाऊ बीज, नेपाळमध्ये भाई टिका आणि भारताच्या काही भागात यम द्वितीया यांचा समावेश आहे.
या शुभ दिवसाच्या उत्पत्तीचे वर्णन करणार्‍या पौराणिक कथा आहेत. भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा पराभव केला. प्रदीर्घ युद्ध जिंकल्यानंतर, भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रा हिला भेट दिली, जी अतिशय आनंदात होती. सुभद्राने तिच्या भावाच्या कपाळावर विधीवत “तिलक” लावला आणि त्याचे स्वागत केले. “भाई दूज” च्या उत्सवाला जन्म देत तिने भगवान कृष्णाचं फुले आणि मिठाईनं स्वागत केलं.
आणखी एक पौराणिक कथा यम, मृत्यूची देवता आणि यमुना, त्याची बहीण यांच्यावर केंद्रित आहे. पौराणिक कथेनुसार अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यमाने आपल्या प्रिय यमुनेला द्वितेयेच्या दिवशी पाहिलं. तिने यमाचं आरती, तिलक आणि मिठाई देऊन स्वागत केलं. यमाने आपल्या बहिणीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की या दिवशी भाऊ आणि बहिणीने यमुना नदीत स्नान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होईल.
पश्चिम बंगालमध्ये “भाई फोटा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाला, बहीण दिवसभर उपवास करते आणि तिच्या भावाच्या येण्याची वाट पाहते. त्यानंतर ती त्याच्या कपाळावर तूप, काजळ आणि चंदनाचा विशेष तिलक तीनदा लावते आणि ओवाळणी करते. ओवाळणीनंतर, बहीण तिच्या भावासाठी प्रार्थना करते आणि ते दोघे भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. पारंपारिक मिठाई आणि पदार्थांच्या भव्य मेजवानीने उत्सवाची सांगता होते.
भाई दूज हा सण महाराष्ट्रात “भाऊ बीज” म्हणून साजरा केला जातो. प्रथेनुसार, भाऊ त्याच्या बहिणीने काढलेल्या चौकोनात बसतो.
हा प्रसंग भारताच्या काही भागात “यम द्वितीया” म्हणून ओळखला जातो. यम द्वितीयेच्या दिवशी आपल्या बहिणीने तयार केलेले अन्न खाल्ल्यास भगवान यम कोणाचेही नुकसान करणार नाहीत अशी आख्यायिका आहे. बिहारमध्ये भाई दूजच्या सणाला गोधन पूजा म्हणतात.
प्रेमळ संबंध प्रस्थापित करण्यासाठी भेटवस्तू नेहमीच आवश्यक आहेत. बहुतेक संबंध त्यांच्या मार्गाने अनोखे असले तरी, भेटवस्तूंमध्ये बंध अधिक दृढ करण्याचा एक आपला मार्ग आहे यावर कोणीही वाद घालू शकत नाही.
कल्याण ज्वेलर्समधील दागिने जे तुमच्या बहिणीसाठी नक्कीच खजिन्यासमान आहेत
डायमंड सॉलिटेअरचे दागिने आकाराने लहानात लहान, मोहक आहेत आणि त्यांची शैली सदैव बांधीव असते. डायमंड झुमके उदात्त सौंदर्याची अभिव्यक्ती आहेत. जर तिला तिचे दागिने, साधे पण शोभिवंत आवडत असतील तर, आम्ही तुम्हाला प्लॅटिनम चेनसाठी क्लिष्टपणे डिझाइन केलेले पेंडेंट किंवा पांढर्‍या सोन्यात डायमंड स्टड सेट करण्याचा सल्ला देतो. ते प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आहेत आणि या उत्सवासाठी आदर्श भेट ठरतात. दैनंदिन डायमंड सेक्शन किंवा ऑफिस कलेक्शनमधील नाजूक पण ठसठशीत हिऱ्याचा हार तिच्या खांद्याला आणि व्यक्तिमत्त्वाला सुंदरपणे भर देईल. तिला दररोज सतेज राहण्यात मदत करा, अगदी कामाच्या वेळेत किंवा तिच्या मित्रांना ब्रंचसाठी भेटत असतानाही.
जर तुमच्या बहिणीला तिच्या बांगड्या आवडत असतील, तर तुम्ही आधुनिक पासून ते बारीक हाताने बनवलेल्या पारंपारिक बांगड्या निवडू शकता. ज्वलंत निळ्या रत्न किंवा माणिक किंवा पातळ स्टॅकेबल सोन्याच्या बांगड्यांचा एक गुच्छ जो हाय-स्ट्रीट फॅशनला पूरक आहे. चंकी सोन्याचे दागिने अत्याधुनिक दिसू शकतात. आधुनिक स्त्रीसाठी ठळक आणि प्रायोगिक डिझाइन पाहा. ती अनिर्बंध, निर्भय आहे आणि तिला अज्ञाताचा शोध घ्यायला आवडते. अलंकृत आकृतिबंध, सिल्व्हर बेस, रोझ गोल्ड तिच्या दागिन्यांच्या यादीला अद्भुतपणे जोड देतील.
जर तिला पारंपारिक दागिन्यांचे कौतुक असेल, तर कल्याण ज्वेलर्सच्या हस्तकला संग्रहातून एक अद्वितीय पीस निवडा. सुंदर नक्षीकाम केलेले कानातले, अंगठ्या आणि हार निःसंशयपणे तिला आनंदाने भरुन टाकतील.
तुमचा भाऊ जतन करेल असे दागिने
कल्याण ज्वेलर्सने पुरूषांच्या कलेक्शनमधून विचारपूर्वक तयार केलेल्या अनोख्या भेटवस्तूंमध्ये आलिशान अॅक्सेसरीज आणि कुशलतेने तयार केलेल्या दागिन्यांचा समावेश आहे. दागिने घालणे प्रचलित आहे. समकालीन पुरुषाला सुसंस्कृतपणा, मिनिमलिझम आणि ऐश्वर्य आवडते. कलेक्शनमध्ये कोणत्याही सौंदर्याला पूरक असणार्‍या विविध प्रकारचे आकर्षक डायमंड ज्वेल्स आहेत. पुरुषांसाठी डायमंड ज्वेलरी भेटवस्तूंसाठी, एक अद्वितीय आकर्षक डिझाइन असलेली सोन्याची अंगठी एक आदर्श भेट ठरते.
क्लासिक सोन्याच्या साखळ्या सदाहरित असतात आणि कोणत्याही प्रसंगासाठी त्या सर्वात योग्य असू शकतात. आयकॉनिक ब्रेडेड, डबल-टोन्ड ब्रेसलेट्स स्टेटमेंट बनवण्याची हमी देतात आणि डोळ्यांना भुरळ घालतात. सजावटीच्या आकृतिबंधासह एक काळी गोमेद अंगठी हे सोने आणि जबरदस्त काळ्या गोमेदचे संयोजन आहे. कोणत्याही पुरुषाच्या संग्रहासाठी अत्यावश्यक असणार्‍या क्लासिक डिझाईनवर लक्षवेधक आणि अनोखा प्रयोग. 24 K चे सोन्याचे नाणे त्या भावासाठी सर्वात शुद्ध सोन्याचे नाणे असू शकते, ज्याची नजर सर्वोत्तम गोष्टींसाठी पारखी आहे. कुर्त्याची बटणे पुरुषांच्या शोभिवंत कपड्यांसोबत शोभून दिसतात. सोन्यामध्ये हिरे जडवलेला, तो सूक्ष्म आलिशानतेच्या स्पर्शासह त्याचा कुर्ता लुक परिपूर्ण करू शकतो. किंवा कदाचित हे भव्य डायमंड कफलिंक्स त्याच्या उत्कृष्ट सूट किंवा टक्सिडोपैकी एकाला उंची देतील.
भाई दूजच्या प्रसंगी आपल्या देशभरात मुक्त हस्ते आणि अपार आनंदाने स्वागत केले जाते. अर्थात, या शुभ उत्सवाला दिलेली नावे आणि त्यातील प्रथा या प्रदेशानुसार भिन्न आहेत. पण भाई दूजचे सार, जे भाऊ आणि बहीण यांच्यातील चिरंतन बंधनाचं प्रतीक आहे, स्वादिष्ट मिठाई आणि भव्य भेटवस्तूंखेरीज, सार्वत्रिक राहते.
आपण घेत राहणं खूप छान वाटतं असलं तरी, जेव्हा तुम्ही भेटवस्तू देता तेव्हा आत्म-समाधानाची भावना असते. या भावना कधीच मोजता येत नाहीत. भेटवस्तू उघडण्यातून तुम्हाला मिळणारा आनंद क्षणिक असतो, तर भेटवस्तू देण्याच्या भूमिकेतून आत्म-समाधानाची उच्च भावना मिळते, जी चिरंतन राहते. भेटवस्तू देण्याच्या कृतीतून कौतुक आणि आपलेपणा व्यक्त होतात, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी ते पुरेसे आहे.
भाऊ आणि बहिणींमध्ये सामायिक केलेले कनेक्शन एकमेव अशा प्रकारचे आहे, एकमेकांना आधार देण्यापासून आणि आपल्या भावंडांच्या खोड्यांमध्ये सहभागी होण्यापर्यंत. म्हणून, तुमच्या भावंडासाठी भेटवस्तू ही तुमच्या दोघांच्याही बंधाप्रमाणेच निखळ असली पाहिजे.

Can we help you?