My Kalyan Mini Store, Airoli, Mumbai

7, Arihanth Co-Oprative Society, St.Xaviours High School Road
Mumbai- 400708

022-61739663

Call Now

Opens at

<All Articles

जेम्सची महाराणी म्हणजेच मोत्यांद्वारे सक्षमीकरणाचा संकेत देत पटवून द्या ओळख

मोत्यांना ‘जेम्सची महाराणी’ म्हटले जाते आणि ते खरेच आहे. मोती अगदी कोणीही रोज परिधान करत नाही. यासाठी आवश्यक असतो एक ठराविक स्तर आणि दिमाख म्हणजे मोत्यांच्या माळेद्वारे एक अद्भुत लुक देता येतो.
भूगर्भातून खोलवर खाणीतून काढलेल्या अन्य दागदागिन्यांच्या तुलनेत, मोती अनोखे असतात कारण ते समुद्राच्या आतून येतात. हे दुर्मिळ खडे गोळा करण्यासाठी समुद्रामध्ये खोलवर बुडी मारुन काढणे याला पर्लिंग म्हणतात. मोती हे एक अद्भुत घटना असतात कारण ते शिंपल्यामधील प्राण्यांद्वारे तयार केले जातात. या शिंपल्यामध्ये धूळ किंवा वाळूसारखा कण शिरतो तेव्हा, त्यातील समुद्री प्रामीण त्या कणाच्या भोवती अनेक वर्षे नेकर नावाचा पदार्थ स्त्रवतो आणि अखेरीस त्यातून चमचमीत मोती तयार होतो. नैसर्गिक पद्धतीने, एक मोती तयार होण्यासाठी अडीच वर्षांहून अधिक काळ लागतो. प्रत्येक मोती हा खास असतो कारण कोणतेही दोन मोती एकच आकार, दिसणे किंवा चमक यामध्ये एकसमान नसतात.
स्त्रियांच्या सौंदर्यासाठी मोती युगानुयुगे वापरले जात आहेत. प्राचीन ग्रीक इतिहासापासून ते ईजिप्तचे फारोआ ते बलाढ्य चिनी राजवंशांपासून ते शाही मुघल साम्राज्यापर्यंत, मोत्यांनी शाही खजिन्यामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. राजांच्या नजिकच्या परिचितांना मोती भेट म्हणून दिले जात आणि शाही स्त्रिया भव्य फॅशनमध्ये मोती मिरवत असत. आजही, मोत्यांचे दागिने एखाद्या स्त्रीचं मन आणि तिची वस्त्रे यांच्यामध्ये एक हक्काचं स्थान मिळवून आहेत.
मोती हे नाजूक क्रीम्स आणि रसायनांच्या नित्य संपर्कामुळे नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असते, त्यामुळं केवळ विशेष प्रसंगांमध्येच मोती परिधान करावेत. शाही लुक आणण्यासाठी एक साधा पर्ल स्टड देखील पुरेसा असतो. फॉर्मल ऑफिस परिधानासाठी देखील पर्ल स्टड्स चांगले असतात. पर्ल ब्रेसलेट्स किंवा बांगड्या दैनंदिन तत्वावर न वापरणे उत्तम कारण त्यांना चरे पडण्याची शक्यता अधिक असते. भव्य सोहोळ्यासाठी, मोत्यांनी मढवलेली चांदबाळी ईअररिंग्ज घ्यावी हे उत्तम. नववधूच्या दागिन्यांमध्ये सोने आणि हिऱ्याचे दागिने सर्वाधिक असले तरी मोत्यांच्या दागिन्यांची स्वतःची जागा या निमित्त हमखास असते. भव्य चोकर्सपासून ते लेयर्ड लांब नेकलेसेसपर्यंत, पर्ल ज्वेलरीने एका क्षणात भव्यता आणता येते. याउलट, मोत्यांची एक साधी माळ एक दर्जेदार आणि दिमाखदार लुक देऊ शकते, एखाद्या फॉर्मल मेळाव्यासाठी अगदी योग्यरित्या.
पर्ल ज्वेलरीचा एक रोचक पैलू म्हणजे प्रत्येक प्रसंगाला अनुकूल आणि प्रत्येक व्यक्तिच्या पसंतीनुसार त्याची स्टाईल, सर्वात शक्य त्या चार्मिंग पद्धतीने करता येते.

Can we help you?